यशवंत देव यांना उदंड व अर्थपूर्ण उर्वरित आयुष्य लाभो.
त्यांनी आतापर्यंत सुंदर गाणी दिली आहेतच, आणखीही चांगली गाणी त्यांच्याकडून मिळोत.
संगीताला मागे टाकून व अभिनयाला महत्त्व देऊन म्हटलेली गाणी लोकप्रिय होण्याच्या या जमान्यात संगीताला त्याचे हक्काचे स्थान पुन्हा मिळवून देण्याच्य कामी त्यांचा भरीव हातभार लागो.
आपली सार्थ कविताही छान आहे. चालीवर ऐकायला मिळाली तर आणखी आवडेल.
एक विनंती:
देवांनी एका संस्कृत भाषेतील सरस्वतीस्तवनाला (समूहगीताला) अतिशय सुंदर चाल लावलेली आहे, हल्लीहल्लीपर्यंत ते आकाशवाणीवर ऐकू येत असे
जय जय हे भगवति सुरभारति, तव चरणौ प्रणमाम:
नादब्रह्ममयि, अयि वागीश्वरि, शरणं ते गच्छाम:, तव चरणौ प्रणमाम:
जय जय जय जयहे, जय जय जय जयहे ॥
असे काहीतरी त्याचे शब्द आहेत. याला निदान तीन कडवी आहेत.
मी असे ऐकले आहे की देवांच्या शिष्यांकडे हे संपूर्ण गाणे (त्याचे शब्द) मिळण्याची शक्यता आहे.
उपलब्ध असल्यास/होऊ शकल्यास कृपया (येथे/अन्यथा) द्याल का?
दिगम्भा