जयश्री, खूपच सुंदर लिहिली आहे तुम्ही ही कविता. खूपच आवडली.

पहिल्या चार कडव्यातल्या प्रश्नांची उत्तरे जरी आपल्याला 'अनुभवा'तून शिकावी लागत असली तरी शेवटचं कडवं मात्र आपलं आपण जोपासून जपायचंदेखील असतं.. त्यामुळे त्यात शेवटी प्रश्नचिन्ह नाही तर असं हसणारं फुल कधी बनता येईल का? ऐवजी असं हसणारं फुल बनून तर जगता येईल ना ! असं लिहिलं तर पहिल्या चार कडव्यांच्या कडव्या पार्श्वभूमीवर शेवटच्या त्या एकाच कडव्यातून सकारात्मक दृष्टीकोन मिळायला मदत होईल असे वाटते.