हॅम्लेटराव,

लेखकाला जे भावले तसेच आपल्याला जाणवायला हवे अशी अपेक्षा करणेही बरोबर नाही - हे पूर्णपणे मान्य, पण हे झाले वाचकाचे काही वाचतानाचे perspective.

एका लेखकाचे perspective काय असावे काही लिहिताना?
आपण जे समोरच्यापर्यंत पोचवण्यासाठी लिहितो आहोत, ते त्याच्यापर्यंत त्याला हवे तसे आणि त्याला हवे तितकेच पोचणार आहे हे जरी माहित असले तरी माझ्याकडूनतरी लिहितानाच माझ्या लिखाणाचे वाचकाच्या नजरेतून थोडेफार मूल्यमापन केले जाते.

अशा मूल्यमापनावर आपण काय लिहिणार कसे लिहिणार हे ठरायला नको; पण हे मूल्यमापन अजिबातच नको करायला असे सुद्धा म्हणता येणार नाही.