थोडेसे विषयांतर होईल पण, भारतातले राजकारण काय यावर एका मराठी काँग्रेसीने (मला वाटते बाळासाहेब भारदे का कोणी), खालील व्याख्या केली त्यात सर्व वैषिष्ठ्ये येतात:
"भारतातले राजकारण म्हणजे, काँग्रेसवाल्यांच्या खुर्च्या, जनसंघाच्या (आता भाजपाच्या) पूजाअर्चा, कम्यूनिस्टांचा मोर्चा आणि समाजवाद्यांच्या चर्चा!"
"जनसंघ" हे नाव बघून लक्षात येईल की हे बऱ्याच वर्षांपुर्वीचे आहे. आता सगळे जण शहाणे झालेत आणि प्रत्येकाची अनेक शकले झाली तरी सर्वजण फक्त एकच - खुर्चीचे लक्ष ठेवून जगत आहेत. तात्पर्य काँग्रेस ही स्वातंत्र्यपूर्व काळा प्रमाणेच अधूनिक काळातील पण पक्षनिरपेक्ष "राष्ट्रीय चळवळ" झाली आहे!