इतके जरी असले तरी मला आजच्या साम्यवादी नेत्याबद्दल कमालीचा आदर वाटतो आणि आजच्या भ्रष्ट जीवनात ज्याच्या बद्दल विनाअट चांगले बोलता येईल इतके ते स्वच्छ आहेत असे म्हटले तरी पुरे असे मी सांगेन.

वरील विधान नक्की कोणाबद्दल करत आहात? नक्की साम्यवाद्यांनी काय केले? प. बंगालचे आजचे स्वरूप काय आहे? ते काय साम्यवादी नेते स्वच्छ राहीले म्हणून आहे असे आपल्याला वाटते का?

त्याही पेक्षा महत्त्वाचे - कम्यूनिस्ट पक्ष म्हणून भारताशी कधी प्रामाणिक राहीला असे वाटत नाही. चिनच्या युद्धात याच "स्वच्छ" पुढाऱ्यांनी चीनची बाजू घेतली तर आता याच लोकांच्या धोरणामुळे बांग्लादेशी येऊन दहशतीचे मूळ होऊ लागले आहेत. नक्षलवादी तर जूने दुखणे आहे.. बाकीचे वाईट आहेत याचा अर्थ ते चांगले होत नाहीत.

वर्ग संघर्ष, वर्ण संघर्ष वगैरे शब्द वापरत यांनी फक्त हिंदू धर्माचा द्वेष करायला शिकवले आणि करत राहीले. मजा म्हणजे तरी देखील सर्व म्होरके हे "तथाकथीत सवर्णच - त्यात इतर धर्माचे येऊ शकले पण काही इतर जातींना येऊन दिले नाही "!

अमेरिकेत मार्टीन ल्यूथर किंग अथवा आपल्याकडे तर अनेक पण मूख्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या व्यवस्थेचा त्रास होत आहे त्या व्यवस्थेत राहून तिच्यातल्या वाईट लोकांशी आणि प्रथेशी लढा दिला आणि शक्यतितके बदल घडवून आणले आणि नवी दिशा दिली. बाबासाहेबांनी जरी धर्मांतर केले असले तरी ते आयुष्याच्या शेवटी केले आणि ते करतानाही आधी स्वत:च घटना दुरूस्ती करून ठेवली की: एक मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू सोडल्यास भारतीय घटनेपुढे सर्वजण हिंदूच समजले जातील...

तेंव्हा भ्रष्टाचाराच्या बाबतीत साम्यवादी जरी स्वच्छ असले हे मान्य केले तरी त्याचा अर्थ त्यांचा आचार देशासाठी "स्वच्छ" होता/आहे असे समजू नका...