टिचकी मारा' आता आपल्याला 'चालवून घेतले' असे वाटते. सवय झाली, की तेच
प्रमाण वाटायला लागेल. 'क्लिक' करताना तरी 'क्लिक' असा आवाज कुठे येतो ?
तेही तर आपण 'चालवूनच घेतले' आहे ना?
मराठी प्रतिशब्दांची शब्दांची सवय झाली पाहिजे. म्हणजे संजोपराव म्हणतात
तसे 'हिडिस वाटणे' बंद होऊ शकते. सुरवातीला मराठी प्रतिशब्द कृत्रिम वाटू
शकतात. मला वाटायचे. पण हळूहळू सवय होते. अंगवळणी पडतात.
चित्तरंजन
'हिडिस
वाटणे'देखील
व्यक्तिसापेक्ष आहे हे सांगायला नको. 'टिचकी मारणे' मला चांगलेच गमतीशीर वाटले होते. उत्तम
मराठी पर्याय आहे. पण 'ऊर्ध्वश्रेणीकरण' बोजड आणि 'विदा' व त्याचे
'चिवडणे' मात्र
थोडे हास्यास्पदच वाटले. प्रतिशब्द ओढून-ताणून बनवू नये असे माझे मत आहे.