कम्युनिष्ट कार्यकर्ते वैयक्तिक चारित्र्यात स्वच्छ असतात हे खरं आहे. आत्ताचे पश्चिम बंगाल व केरळचे मुख्यमंत्री यांचे उदाहरण घेऊ शकतो.  मागे एका प्रतिसादात मी संघ आणि कम्युनिष्टांतील एक समान शक्तिस्थळ म्हणून या कार्यकर्त्यांचा उल्लेख केला होता.

राजकीय मते त्यांची भिन्न आहेत. चीनच्या आक्रमणाच्या वेळी यांची भूमिका देश विरोधी होती हे खरं आहे. चीन विरोधी जपानच्या मदतीने लढल्यामुळे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा आत्ता आत्ता पर्यंत अस्पृश्य होते.

मात्र तरी सुद्धा आज सामान्य कामगाराला आणि मजुराला आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढणारा पक्ष म्हणून कम्युनिष्ठच आठवतात.

सौ. वृंदा करात जेवढ्या महीला घेऊन रस्त्यावर येऊ शकतात तेवढी पोच इतर कुठल्या पक्षाच्या महिलेत असेल असं वाटत नाही.

कम्युनिष्ठांच्या पक्ष संरचनेत पोलिट ब्युरो ही सर्वोच्च कार्यकारी संस्था आहे. वृंदा करात ह्या पोलीट ब्युरोच्या पहिल्या महीला सदस्या आहेत. यावरून यांच्यात स्त्रियांचा अनुशेष आहे असं दिसतं. जाणकार माहिती देतील.

पश्चिम बंगाल मधील यांची ग्रामपंचायतीपासून ते विधानसभे पर्यंत असलेली पोलादी पकड पाहिल्यास त्यांच्या विलक्षण संपर्क यंत्रणेची प्रचिती येते.

एक प्रश्न: साम्यवाद आणि समाजवादातील फरक कुणी सांगेल का?  

नीलकांत