आपण जेंव्हा म्हणता की "...सौ. वृंदा करात जेवढ्या महीला घेऊन रस्त्यावर येऊ शकतात तेवढी पोच इतर कुठल्या पक्षाच्या महिलेत असेल असं वाटत नाही.", तेंव्हा हे विसरू नका की,

  1. मृणाल गोरे यांनी पाणीवाली बाई म्हणून आणि लाटणी मोर्चे काढून बायकांच्या समस्या तडीस नेल्या होत्या.
  2. इंदीरा गांधींना तर बांग्लादेशाच्या युद्धाच्या वेळेस रा‌व. संघाने पाठींबा देऊन त्यांची तुलना "दुर्गे"शी केली होती
  3. त्याच इंदीरा गांधींच्या विरुद्ध आणिबाणिच्या वेळेस तडकून उभी राहून संपूर्ण महाराष्ट्र आणि कदाचित इतर प्रांत पिंजून काढणारी "दुर्गे दुर्गट भारी.." म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या दुर्गा भागवतांचा तेंव्हाचा करारी बाणा बघून (आणिबाणीस) घाबरून बसलेल्या पुरूषांना बांगड्या घातल्या पाहीजेत असे म्हणावे लागले होते.
  4. त्याच आणिबाणित आणि नंतरही आंदोलने करणाऱ्या प्रमिला दंडवतेंना पण आपण विसरत आहात.
  5. अजून पण उदाहरणे असतील...

प्रत्येक पक्षाच्या किंवा विचारप्रणालीत आपल्याकडे स्त्रीया दिसतील पण याचा अर्थ अनुशेष भरून निघाला आहे असा होत नाही.