तुमच्यामुळे जगात काय बदल घडले हे सांगा. मग बघा ७०-८० काय ७-८ शब्द तरी लागतात का?!
प्रस्तुत बदल म्हणजे रेडियमचा शोध लावण्यासारखे दूरगामी असण्याची गरज नाही. अगदी 'चार लोकांना शिकवून-सांगून दिशा दिली' किंवा 'मी जिवंत असताना ५० झाडे लावली' यासारखे क्षुद्र वाटणारे बदलही चालतील.