मुंबईत परप्रांतीयांच्या येऊन वास्तव्य करण्यास विरोध असणारांस आर्टिकल ३७०ला (विशेषतः जम्मू-कश्मीरमध्ये गैर-जम्मू-कश्मीरींस मालमत्ता विकत घेण्यास आणि त्याद्वारे कायम वास्तव्य करण्यास असलेल्या बंदीच्या तरतुदीस / जम्मू-कश्मीरींच्या अशी तरतूद कायम ठेवण्याच्या आग्रहास) विरोध असू नये. (माझा नाही!)
भारतात सर्वत्र समान कायदा असावा असा अट्टाहास असेल (माझा नाही!), तर जम्मू-कश्मीरबद्दल जी अपेक्षा ठेवली जाते, तीच मुंबईबद्दल ठेवावी.
जम्मू-कश्मीरमध्ये एक भारतीय नागरिक म्हणून कायम वास्तव्य करण्याचा जन्मसिद्ध हक्क मला असावा, असे जर मला वाटत असेल (जम्मू-कश्मीरपुरते मला वाटत नाही!), तर परप्रांतीयांच्या मुंबईत येऊन राहण्यास विरोध करण्याचा मला नैतिक अधिकार राहत नाही.
- टग्या.