वा सुवर्णमयी,
ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे... हा शेर सर्वांत आवडला.
'सत्कार'ही आवडला.
मतल्यातला आशय आवडला- त्यावरून प्रवासींनी पूर्वी लिहिलेली एक गझल आठवली-
'लोकशाहीचे प्रणेते बोलले
लोक कोठे? फक्त नेते बोलले!'
- कुमार
ता.क. साधारणतः सूर्य अस्ताला गेला की काजवे आनंदी होतात. कृष्णशास्त्री चिपळूणकरांची एक अन्योक्ती आठवली-
राहूच्या वदनी अजी गवसता तो भानु दैवे अहा
कैसे क्षुद्रहि काजवे चमकती त्यांच्यापुढे हे पहा!