मिलिंद, हे धमाल गाणे दिल्याबद्दल धन्यवाद !

हाहाहा ! जबरदस्त अनुभवून पटलेलं असल्याने माझं जबरदस्त आवडतं गाणं आहे हे !

'याला ओवाळायचि नाहिं मी यंदा ' असं न म्हणतादेखील यावेळेस हापिसाच्या कामांमुळे लवकर परतावं लागल्याने भाऊबीजेला नाही ओवाळू शकले दादाला. :,( "प्रत्यक्ष ओवाळलं नसलं तरी मनोमन मी तुला ओवाळलं आहे. मला फक्त एवढंच सांग की माझी ओवाळणी कुठेय?" असं मी म्हणता म्हणाला कसा.."मनोमन मीही दिली ना तुला ओवाळणी.. पोहोचली नाही का अजून? असं कसं मन आहे तुझं?!" त्याचं हे बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आणि ओठात हसू येऊन तोंडी हेच शब्द आले.. 'आई, बघ ना कसा हा दादा? मला चिडवायचं हाच याचा धंदा..!' :-) एकूणात काय तर.. आमच्यातली चिडवाचिडवी मागील अनुभवातून पुढे चालू ! ;-)