काय करायचे ते सांगा. लोकल,बस जिकडे तिकडे हिंदी.
कृपया प्रतिसाद लिहिताना मराठी माणसाच्या चुकांवर बोट ठेवू नका.

काय करायचे ते सांगा म्हणजे नक्की काय सांगावे? भैय्याकडून कुठलेही काम करून घेऊ नका.. म्हणजे रिक्षावाला, टॅक्सीवाला शोधून मराठीच असावा. भैय्या दिसला की टाळा.. असले काहीतरी मूर्ख उपाय येणे अपेक्षित आहे का?

मला काम संपवून दमून घरी जाताना रिक्षा हवी असते. जवळचं भाडं असेल तर ९०% रिक्षावाले येत नाहीत.  एखादा यायला तयार झाला तर त्याचं मूळ गाव शोधत बसू? माझ्या हाताखाली ड्रेसमन काम करतात. ते एकतर मलबारी ख्रिश्चन नाहीतर यूपी मधले मुस्लिम असतात. ह्यांना टाळून मराठीच माणसं घ्यायचा प्रयोग मी एकदा करून बघितला पण... दुर्दैव... माझं काम जायची वेळ आली होती.. का ते सांगत नाही कारण मराठी माणसांचे दोष न सांगायची अट आहे..

मुद्दा असा आहे.. स्वतःचे दोष न तपासता तुम्हाला उपाय हवा असेल तर ते अशक्य आहे. तुम्ही फक्त ओरडतच रहाल.