जेथे जेथे देवनागरी मजकूर भरता येतो, तेथे तेथे चावीफळ्याची प्रतिमा दाखवलेली आहे. तिच्यावर टिचकी मारलीत की लीप्यंतराचा तक्ता तुम्हाला पाहायला मिळेल. असे कुठे होत नसेल तर मात्र त्यात लक्ष घालायला हवे. कृपया असे कुठे होत नसेल तर नीट खुलासेवार माहिती द्या म्हणजे पडताळून पाहता आणि उपाय करता येईल.
टीप: तक्ता नीट न दिसण्यामागे काही तांत्रिक चूक होती, ती आता निस्तरली आहे. कृपया आता तक्ता नीट दिसतो की नाही ते पाहा आणि काय ते सांगा.