शु. चि. मध्ये चुका आहेत हे मान्य. त्या सुधारता येऊ शकतात.पण शुद्धलेखन तपासण्याची एक सहज, सुलभ सुविधा उपलब्ध असतांनासुद्धा आम्ही ती वापरणारच नाही ह्याला काय म्हणणार?

मान्य, व्यक्तिशः मला शु. चि. चा उपयोगच झाला आहे. मनोगतावर आल्यापासून आजपर्यंत वाटचाल पाहिली तर आजकाल मलाच शु. चि. च्या चुका अधिक दिसतात, हे माझ्यातील सुधारणेचे लक्षण असावे. :)

आणि जरी प्रत्येकवेळेस 'प्रतिसादां'साठी मी शु. चि. वापरला नाही तर तो माझा निष्काळजीपणा किंवा घाई-गडबड, तरीही शु. चि. वापरावाच असं माझं मत आहे. जे वापरत नाहीत ते निष्काळजी आहेत असं मी म्हणेन. (यांत बरेचदा माझाही समावेश होऊ शकतो.)