चिरंजीव शुचिच्या प्रगतीबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तो आता प्रगल्भ होत आला आहे. तो ९० टक्के 'बिनचूकपणे' काम करतो असे मला वाटते. 'मध्यंतरी' काही चुका दाखवीत नाही.

एकंदर आपले शुद्धलेखन बरे आहे असा समज. त्यामुळे कशाला शुचिला त्रास द्यायचा आणि स्वतःचा वेळ घालवायचा, असे बहुतेकदा वाटते.

'परिघ' आणि 'परीघ' हे दोन्ही शब्द शब्दकोशात बरोबर दाखविले आहेत. अशावेळी सुचवणींत चुका दिसल्यावर नोंद ठेवल्यास आधीच्या शब्दाची हकालपट्टी व्हायला नको. 'परघ'सारख्या शब्दासाठी हे दोन्ही पर्याय दिसायला हवेत.

चित्तरंजन

अवांतर:

'अचूकपणे' तसे 'बिनचूकपणे' असावे. 'मध्यांतर' हा शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य असले तरी रूढ शब्द 'मध्यंतर' आहे, असे वाटते. जसे 'अष्ट्याक्षरी' कोणी म्हणत नाही; सारे 'अष्टाक्षरी'च म्हणतात.