२-३ गोष्टी...

पुरावे?? नक्की कशाचे? जगात बहुतांश संख्येने अतिरेकी एकाच धर्माचे आहेत या 'योगायोगाचे'? काहितरी उगाच..

अगदी मान्य की हे असे लिहिणे अयोग्य.. फक्त त्याला हीन, गुन्हा, हद्द इत्यादी म्हणत 'होलीयर दॅन दाऊ' असा आव आणणाऱ्यांच्यापैकी एकाच्याही मनात हे उमटत नसेलच याची खात्री नाही. तरीही समर्थन मी करत नाही.

ही एक प्रतिक्रिया आहे. अयोग्य असण्यापेक्षा दुर्दैवी आहे. ती माझ्याकडून आली असली तरी मला त्याचा खेद आहे. पण येऊ नये अशी प्रतिक्रिया मनात उमटणारे ८०% तरी हिंदू असतील याची मला खात्री आहे. उघडपणे कोणी म्हणत नाही इतकेच. दुर्दैव याचं की अशी प्रतिक्रिया निघण्याची परिस्थिती आज आहे.

प्रतिक्रियेबद्दल गुन्हा इत्यादी बोलणाऱ्यांनी... देशाच्या सुरक्षिततेला धोक्यात आणणाऱ्यांविषयी आणि त्यांना वाचवण्यासाठी देशाला वेठीस धरणाऱ्यांविषयी केवळ चौकशीस पात्र असे म्हणावे हेही दुर्दैवीच.. अश्यांच्यामुळे माझी दुर्दैवी प्रतिक्रिया तीव्र होण्यास मदतच होते.

यालाच समाजवादाचे विष असेही काही जण म्हणताना ऐकले होते..