ज्ञ हे अक्षर मुळात ज् + ञ असे जोडाक्षर आहे. (ज्‍ञ)

तत् जानाति इति तज्ज्ञ: अशी काहीशी तज्ज्ञाची व्याख्या आहे. हा शब्द लिहिताना तत् आणि ज्ञ (ज्‍ञ) ह्यांचा संधी व्हायला हवा. त् पुढे ज आला की त्या त् चा ज् होतो आणि तो पुढच्या अक्षरात मिसळतो त्यामुळे तत् + ज्ञ (ज्‍ञ) -> तज्-ज्ञ(ज्‍ञ) -> तज्ज्ञ (खरे म्हणजे तज्ज्‍ञ!)

त् आणि ज ह्यांच्या संधीची इतर उदाहरणे -

उत् + ज्वल -> उज्ज्वल, सत् + जन -> सज्जन

चू. भू. द्या. घ्या.