तज्ज्ञ हा शब्द बरोबर आहे. का ते मला माहीत नव्हते. कारण मी संस्कृतात अज्ञ किंवा 'ढ'. जेहेत्ते असे आहे म्हणून स्वीकारला. काही दिवसांनी कदाचित तज्ञ रूढ होईल. पण सध्या तज्ज्ञ हा शब्द बरोबर असल्याने तो वापरतो आहे. कठीण आणि कठिण ही दोन्ही रूपे स्वीकारार्ह असली तरी आजकाल कठिण कोणी वापरत नाही. तसेच परिघाचे होऊ शकते.
इतर शब्दांबाबत असेच म्हणता येईल. शुद्ध रूप कळल्यावर तेच वापरावे, हे माझे मत.