आमच्या ग़ोव्याची पाककृती मनोगतावर आणल्याबद्दल धन्यवाद!
Vinha = वाईन आणि d'Alho = लसूण असे वाईन आणि लसणीचे विंदालू.
आजही हा पदार्थ लिस्बन (पोर्तुगाल) येथे सर्व प्रकारच्या मांसात बनवितात. यात विनेगार नसते,तसेच आले ही नसते.
वेळेनुसार वाईन व लसूण याचा वापर कमिअधिक होतो,दुपारच्या जेवणात या दोन्ही गोष्टी विंदालूत नसतात,फक्त नावातच असतात.त्याच बरोबर वाइन आणि लसूण याचे सॉस सारखे मिश्रण सर्व्ह करतात. जेणे करुन आवडीनुसार गरजेनुसार ,व्यक्तिनुसार त्याचा वापर करता येतो.
पूर्वी वाइन +लसूण याचे मिश्रण बनवून ते 'मांस प्रिझर्वेटीव' सारखा त्याचा वापर करत.परंतु आज ती गरज नसल्याने वापर करतातच असे नाही.
विसोबांच्या खाद्यधर्माचा मान ठेवून सांगावेसे वाटते आज भारतीय विंदालु (वाइन ऐवजी विनेगार व आले आणि नाना प्रकारचे मसाले +आलुमिश्रित करी)लिस्बन येथे मूळ विंदालु पेक्क्षा जास्त लोकप्रिय आहे.तेव्हा मूळ पदार्थातला हा बदल पोर्तुगीजानी सुद्धा मान्य केलेला आहे.
वास्तविक पाहाता जे जे चांगले ते ते घ्यावे,त्यात बदल करूनी अजून चांगले करावे आणि जनासी वाटावे.. जय खाद्यधर्म!
कळावे,आपला
बन्याबापू