प्रशासक आणि या विषयातल्या तज्ञांसाठी माझा एक विचार इथे मांडत आहे. काही लोक आत्मविश्वासामुळे, काही आळसाने, तर काही अज्ञाने शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून लेखात लिहिलेला शब्द तुमच्या शब्दसंग्राहात नसेल तर आपोआप त्याखाली लाल रेषा उमटते. तसेच त्या वेळेला मूषकाची उजवी कळ दाबली तर पर्यायी शब्द दिसतात. अशा रितीने लिहिण्याच्या वेळीच आपल्याला सावधानतेचा इशारा मिळून शब्द तपासण्याची संधी मिळते.
मनोगताचे लिखाण करताना अशी सोय उपलब्ध असेल तर इथले लेखन सजगपणे तपासले जाऊन लेखकाला जाणीवपूर्ण ते सादर करता येईल असे मला वाटते.
मनोगतींचे याबाबत विचार जाणून घ्यायला आवडेल.
कलोअ,
सुभाष