वर्गहीन समाजाची निर्मिती करण्यास मार्क्स म्हणतो साम्यवादी रचना अंमलात आल्यावर मजूर व मालक असे संबंध राहणार नाहीत‌. समाजात एकच वर्ग राहील. बहुजन समाजाची पिळवणूक करणारे शासन किंवा राज्यही राहाणार नाही व वर्गहीन आणि राज्यहीन समाजाची व्यवस्था निर्माण होईल. राज्य हे धनिक वर्गाच्या स्वार्थाकरीता निर्माण व शोषित वर्गावर नित्य दडपण आणणारे आहे.