*संदर्भ "मराठी लेखन-कोश" संकल्पना,कोशरचना,संपादन: अरुण फडके ; मार्गदर्शन: डॉ. ग. ना. जोगळेकर; प्रथम प्रकाशन वर्ष : २००१ (प्र.केशव भिकाजी ढवळे) .मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांनुसार होणारी शब्दांची विविध रुपे वैशिष्ट्यपूर्ण मांडणीने दाखवणारा पहिला मराठी संपूर्ण शुद्धलेखन कोश आहे. या कोशाने या कोशाने आधीच्या सर्व कोशांचे संदर्भ नियमांच्या मर्यादेत शास्त्रियपणे लक्षात घेतले आहेत.शब्दांच्या शक्य असलेल्या सर्व सामान्यरूपांची माहिती हा कोश देतो. महाराष्ट्र शासनाचा ना̱. गो. नांदापूरकर पुरस्कार ; ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कै. वा. अ. रेगे पुरस्कार ; मराठी अभ्यास परिषद पुणे यांचा महाबँक पुरस्कार मिळालेला हा ग्रंथ आजमितीस मराठी शुद्धलेखन या विषयाचा अग्रगण्य प्रमाण संदर्भ ग्रंथ ठरतो.
शुद्धलेखनात रस असलेल्या व्यक्तींनी जवळ बाळगायलाच हवा.
'कठीण' हा शब्द तत्सम असून 'कठीण' असाच असावा.(नियम क्र. ७.१ "मराठी लेखन-कोश " पान क्र.४१
विविध पाठभेद निर्माण होण्याचे कारण लोकांना म.सा. महामंडळाचे नियम आणि सामान्यरूपात कसे वापरावेत आणि जिथे नियम माहीत नाही त्याचे काय करावे याचे आकलन होत नाही. ज्यांना शुद्धलेखन करावयाचे आहे त्यांच्या पुरता बहुसंख्य शंकांवर/वादांवर हा कोश पडदा टाकतो.
- विकिकर