पुढचे भाग लिहिताना एक काळजी घ्यावी. परिच्छेदांची लांबी बदलणे तुमच्या हातात नसले तरी वाचक लेख वाचत असताना कोठल्याही वेळी लेखाची सुरुवात किंवा शेवट ह्यांतले निदान एक तरी दिसत राहील इतक्याच लांबीचे भाग करावेत. नेटावर वाचणे आणि पुस्तक वाचणे ह्यात हा एक फरक जाणवलेला आहे. हलकेफुलके नसलेले लिखाण, विचार करायला लावणारे लिखाण वाचायला अतिशय संयम लागतो. (शिवाय पुस्तक पडून वाचता येते, डोळ्यांना आणि हाताला येणाऱ्या थकव्याप्रमाणे सतत पुढे मागे करून स्थिती बदलत राहता येते. मध्ये काही व्यत्यय आला तर वाचनखूण घालून पुस्तक बंद करता येते आणि मागाहून पुन्हा क्षणार्धात त्या पानावर पुन्हा उघडता येते, तसे संगणकाच्या बाबतीत (आमच्या अनुभवाप्रमाणे अद्याप) करता येत नाही.) प्रदीर्घ लेखाची लांबी पाहून 'नंतर वाचू' असे म्हणून वाचक इतरत्र वळण्याचा धोका असतो.

असो.

'क्रमशः' आता लेखाखाली लिहिलेले आहे.