बाकी बिरुटेशेठ, एक गोष्ट मात्र आपण चांगली नाही केलीत बुवा! आम्ही स्वच्छ, कुठेही सुरकुती न ठेवता ज्या चादरी शुद्धलेखनाच्या गाद्यांवर घातल्या होत्या, त्या मात्र तुम्ही पुन्हा यथास्थित विस्कटून ठेवल्यात बघा!
तात्या,या पुढे शुद्धलेखनाची काळजी घेईन! बिरुटेशेठ म्हणता नं तुम्ही मला,आम्हाला इतकं मोठेपणा देऊन कोणही बोलल्याच आठवतं नाहीऽ अन आमच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. आमचं हसू उंबऱ्याच्या फुलासारखं आहे.
ठीक आहे, आम्ही त्या पुन्हा एकदा कुठलीही सुरकुती न ठेवता घालू. काय करणार? तुम्ही सुह्रुद पडलात ना आमचे!
चूक झाल्यावर, चुकांवर पांघरून घालणारा,सावरून घेणारा,कान धरून समजून सांगणारा ...आपलाही एक भला माणूस मनोगतावर आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहेच.(इथे आम्ही भावुक होतो)
एखादा दिवस देवगडात चक्कर मारीन म्हणतो. आंब्याला मोहर कितपत आला आहे, कसा आला आहे हे पाहायला हवं ना! तसा अजून अवकाश आहे म्हणा...
देवगडाची माहिती आहे.म्हणून सांगतो,नदी चांगली वाहतेय.गुरुवारीच जाऊन आलो,एकादशी ही होती.माथा टेकून आलो.तुम्ही नक्की येणार असाल तर,येईन म्हणतो मी ही तुमच्या बरोबर.आणि आग्रहाने वाढीन, तुम्हाला आवडणारा मेनू.
आपला
तात्याप्रेमी (बिरुटेशेठ)