आनंदघन,
आर्यभटाच्या कामाबद्दलचे काही दुवे इथे देतोय: त्यात मी ज्या संमेलनाचा उल्लेख केला तो दुवा पण आहे. एक मात्र लक्षात घ्या. ह्या प्रतिसादात तुम्ही जे लिहीलय की गौरव करणाऱ्यांमध्ये सर्व माहिती असलेले कमी असतात, आणि हे कुठल्याही बाबतीत होऊ, शकतं, फक्त आर्यभटाच्या बाबतीत नाही. माझा आक्षेप तुमच्या ह्या विधानावर होता की आर्यभटाने किंवा इतर भारतीय शास्त्रज्ञांने केलेले वर्णन अपुरं नाहीतर अस्पष्ट होतं.
तुमच्या प्रतिसादावरून मला हे समजलं नाहीये की तुम्ही आर्यभटीय, लिलावती, कलावती इत्यादी ग्रंथ वाचून किंवा त्यावरचे अभ्यासपर ग्रंथ वाचून म्हणताय की त्यांनी हे समजावून सांगितलं नाहीये की तुम्हाला माहीत नाहीये म्हणून तुम्ही तसं म्हणताय.
अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुसलमानांच्या आक्रमणानंतर आपल्याकडील बरचस साहित्य नष्टं झालं आहे, त्यामुळे आता आपल्याला जे उपलब्ध आहे ते काहीच दुवे आहेत, त्यांवरून आपल्याला अनुमान बांधायचे आहे. त्यामुळे त्या काळी काय प्रकारची शास्त्रीय पद्धत आपल्याकडे प्रचलित होती हे आता सांगणं कठीण आहे.
दुवे:
विकिपीडिया
संमेलन
चरित्र