"मराठी भाषेचा इतिहास" मध्ये डॉ. ग. ना. जोगळेकरांनी माहिती दिली  आहे की, मध्ययुगीन महाराष्ट्रातील मंदिरात प्राकृत/मराठी  अपशब्द लिहिलेल्या शिलालेखांचा उपयोग केला जात असे. हे अपशब्द मंदिरातील सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहचवणाऱ्या असामाजिक तत्त्वांना उद्देशून असत.