व्वा प्रसाद. फार दिवसांनी आलास पण सुंदर गझल घेऊन आलास.

ऊब येण्याला जरा घरट्यामध्ये
जीव सारा अंथरावा लागतो...

रंगते ना काव्य शाईने गड्या
दर्दही थोडा झरावा लागतो!

क्या बात है!

पाकळ्या मिटल्या जरी माझ्या तरी
हाय, भृंगांना सुगावा लागतो...

वा.

ठेवली खाली जरा मी लेखणी
वादळालाही विसावा लागतो!

आता विसावा खूप झाला. पुन्हा जोमाने लिहायला लाग.