अमेरिकन, युरोपिअन किंवा एशियन अशा निरनिराळ्या वंशांचा वेगवेगळ्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आढावा घेतला तर चर्चेला एक सीमीत पण तरीही वेगवान अशी वेगळीच कलाटणी मिळते जिचा अंतिम निर्णयावर निश्चित परिणाम व्हावा. हा प्रश्न जटिल आहे हे तर खरेच, पण त्याचबरोबर वेदिक काळापासून चालत आलेल्या पुरोगामी विचारसरणीवर तथाकथित बूर्ज्वा पंडितांच्या डाव्या, उजव्या, सरळ आणि वाकड्या
विचारसरणीचा अतिरेक हाही तितकाच ज्वलंत आणि विचारप्रवर्तक प्रश्न आहे,
तरीही सर्व बाजूंनी विचार केल्यास प्रखर साम्राज्यवादी धोरणाचा आत्यंतिक परिणामही जाणवतो. मूळ मुद्दा हा की वेगवेगळ्या विचारधारांमधून प्रवर्तक अशा एक किंवा अनेक मूल्यांचा उदय किंवा अस्त हे मानवी अभिव्यक्तिचे एक सहजसुंदर परिमार्जन आहे ज्यामुळे हिंसा, द्वेष, लोभ, मत्सर अशा विविध भावनांचे संकलन, आकलन, प्रचलन किंवा निर्मूलन होते अथवा होत नाही, पण नेमकी हीच अनिश्चितता आपल्याला एक नवा
मानसशास्त्रीय दृष्टीकोन देते जिच्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात दोन क्षण विरंगुळा मिळायला वाव मिळतो किंवा मिळत नाही.
हॅम्लेट