संजोप राव,
सगळे लेख तुम्ही प्रकाशित केल्या केल्या वाचलेत! प्रतिसाद दिला नाही कारण लेख वाचून झाल्यावर थोडावेळ सुन्नपणा येतो... नकळत डोळ्यांसमोर चित्रे फिरू लागतात. महारोग्याबरोबर असलेली गरोदर बाई, मनाच्या अवस्थेला दिलेली गांडुळाचे वारूळ फुटण्याची उपमा, हे सारे झेलायला कठीण जाते मला. तरीही नेटाने वाचते आहे. पहिल्यापासून त्यांची पुस्तके वाचायची भीती वाटते. कधी काय समोर येईल आणि ते मनाला कसे अस्वस्थ करेल सांगता येत नाही. खूप वेळ लागतो त्यातून बाहेर पडायला.
आपण कष्ट घेऊन हे मनोगतावर प्रसिद्ध करीत आहात... धन्यवाद.
-सीमा