उदा. म.टा. किंवा सकाळ - जे युनिकोडमध्ये आहेत) ते येथे तेवढ्यापुरते
नकलून त्याची शुद्धिचिकित्सा केली की अशा प्रकारे चुका दाखवून देता येतात.
(हे केवळ माहितीसाठी लिहिलेले आहे. हा आग्रह, विनंती वा सुचवण नाही. आम्ही
वेळोवेळी ह्या आणि इतर स्रोतांतील मजकुरांद्वारे हे करीतच आहो आणि करीतच
राहू.)
मी फावल्या वेळात हे करून पाहिले. काही वेळा मूळ मजकुरातच शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात.
त्यामुळे प्रत्येकाला डोळसपणे 'नोंद ठेवावी' लागेल, असे लक्षात आले. उदा., 'मोहिम', 'दलीत',
'दंगलसदृष्य' अशा चुका मूळ मजकुरात आढळल्या. पण प्रत्येक जण डोळसपणे नोंद ठेवीलच असे नाही. अशावेळी कुणाकडून अशुद्ध शब्दांची नोंद झाल्यास काय?
दुसरे म्हणजे, काही वेळा काही लालटिंबीग्रस्त शब्दाची नोंद ठेवायला गेलो तेव्हा 'नोंद ठेवा' हे बटण डिसेबलावस्थेत दिसले. नेमक्या कुठल्या, कशा शब्दांना लालटिंबी रोगाची लागण होते? शुद्धिचिकित्सकाची शुद्धाशुद्धतेची कल्पना काय?
कळावे.
चित्तरंजन