नवीन पिढी आमच्यापेक्षा निश्चितपणे चांगल्या स्थितीमध्ये आहे व त्याचा लाभ जुन्या पिढीलाही मिळतच आहे. (उदा: इंटरनेटवरील मनोगत) याचा आनंदच आहे. त्यामुळे "गेले ते दिन गेले" म्हणत मी कधीच उसासे टाकले नाहीत.  नव्या युगाचे नेहमी स्वागतच केले आहे. पूर्वीच्या काळी इतर दिवसांच्या मानाने दिवाळीचे दिवस खूप वेगळे वाटायचे. एकंदर राहणीमान सुधारले असल्याने त्या दोहोतील फरक आता जाणवेनासा झाला आहे एवढेच. त्याची अजीबात खंत नाही.