चंद्राचे चालणे लक्षात येते कारण सूर्याच्या तुलनेने तो रोज सुमारे ५० मिनिटांनी मागे पडतो. आपली रात्र सूर्यास्तानंतर सुरु होते त्यावेळी उगवणारे तारे रोज आदल्या दिवसाच्या मानाने सुमारे ४ मिनिटे आधी उगवतात. हा फरक रोजच्या रोज जाणवणार नाही पण आठवड्याच्या अंतराने पाहिल्यास कळून येईल.