सर्वप्रथम या दुव्यांबद्दल धन्यवाद.

मी हे दुवे अद्याप वाचलेले नाहीत तरीही प्रतिसाद देण्याचा मोह टाळता येत नाही. तेव्हा चू. भू. दे. घे.

रोम हा शब्द संस्कृत असू शकतो किंवा त्या शब्दापासून रोमानी हे नाव घेतले गेले हा मलाही नवीनच शोध लागला. मी आतापर्यंत त्याची व्युत्पत्ती 'रोमन' - 'रोमानिया' - 'रोमानी' अशी समजत होते. असो.

भारतातून काही तथाकथित कनिष्ठ जमातीचे लोक व्यापार व युद्धांच्या दरम्यान काफिल्यातून युरोपाच्या दिशेने स्थलांतरित झाले असावेत. मुख्यत्वे या लोकांचा उद्योग लहान मोठी कामे करून किंवा लोकांना रिझवण्याचे (संगीत, नृत्य) उद्योग करून आपले पोट भरणे असा असावा. याचबरोबर भुरट्या चोऱ्या, जादू, मंत्र तंत्र असेही उद्योग केल्याने सदर जमातीबद्दल स्थानिक लोकांच्या मनात किंतूच राहिला असावा. (काही प्रमाणात आपल्याकडे जे डोंबारी, फासे पारधी जातींच्या नशिबी येते तेच उपरेपण रोमांच्या नशिबी आले असावे. समाजाने त्यांच्याशी फटकून वागणे टाळता येत नाही.)

त्याही पलीकडे भारतातून परागंदा झालेल्या मूळ भारतीय वंशाच्या माणसांबद्दल भारतीयांचं दुर्लक्ष.

हे मात्र फारसं रास्त वाटत नाही. तत्कालीन समाज रचना लक्षात घेता या जमातींकडे नक्की कोणी लक्ष पुरवायला पाहिजे होते? (जिथे देशांत एकसंधता नव्हती, दळणवळाणाची साधने आणि माध्यमे अपुरी आणि अप्रगत होती तिथे हे कसे शक्य असावे?) तसेही या समाजाने आपली नाळ भारताशी जोडून राहील असे काही केले असावे असे वाटत नाही. त्यामुळे कालांतराने दुवे तुटले असावेत आणि ही जमात मूळ भारतातून तिथे गेली ही माहिती दोन्ही बाजूंनी धूसर झाली असावी.

सध्याच्या काळातही देशांतर्गत प्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी नाही. तेथे नाळ तुटलेल्या जमातींची काळजी करणे व्यवहार्य वाटत नाही.

चू. भू. दे. घे.