पेंग्विन हा माझा आवडता पक्षी आहे. लेख छानच झाला आहे.
या पक्ष्यावरील एक लघुचित्रपट 'मार्च ऑफ दि पेंग्विन्स' अतिशय सुंदर आहे.
एका जातीच्या  पेंग्विन पक्ष्याची मादी अंडं देते आणि दूर समुद्रात निघून जाते.  पेंग्विन जोडप्यातील नर आपल्या पायावर अंडं सांभाळून ठेवतो. त्याच्या पोटावरील एका पडद्यामुळे ह्या अंड्याला ऊब मिळते . अंड्यातून पिलू बाहेर यायच्यावेळी मादी परत येते आणि आपल्या चोचीने राखाडी रंगाच्या छोट्या पिलाला भरवते. त्या वेळी नर अन्नाच्या शोधार्थ निघतो.
हा भाग त्या लघुचित्रपटात खूप सुंदररीत्या चित्रित केला आहे.
अंजू