मला सुद्धा काही गोष्टींची आठवण येते....
१. गोष्टीची पुस्तके जशी जादुचा शंख, उडता राजपुत्र, साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी भाग १ते१०, चिंगी.
२ अ,ब,क लिहीलेले रंगीत तक्ते (आजकाल सगळीकडे इंग्रजी तक्तेच दिसतात.)
३. पाटीवरच्या गुळगुळीत रंगीत पेन्सीलीचे रुळ आणी दगडी पाटी, शाळेत न्यायची हिंडालीयमची छोटी पेटी.
४. चिध्यांची बाहुली आणी लाकडाची बैलगाडी.( सावंतनगर का कुठ्ल्या लाकडी खेळण्याच्या कारख़ान्यात हे तयार व्हायचे)
५. आणी माझे सदैव आत्ममग्न असणारे नातेवाईक (आता आठवतात कारण आता ते भेटतच नाहीत : )