रेडिओवर पुणे केंद्रावर 'आपली आवड' रविवारी रात्री बहुतेक सादर होत असे. त्यात ते ठराविक गाणे कोणाकोणाला ऐकायचे आहे त्याची लांबलचक यादी ती निवेदिका देत असे.
अजून एक मालिका होती. त्या मालिकेचे नाव, त्याची प्रसारित होणारी वेळ, वार व त्यामधले कलाकार आता आठवत नाहीत, विषयही नक्की काय होता तेही आठवत नाही. फक्त आठवते की त्यातला नवरा त्याच्या बायकोला 'मिने, मिने, मिने' असे म्हणायचा. ती बायको तिच्या भाऊजींना टेकाडे भाऊजी म्हणायची.
अजून एक पुणे केंद्रावर श्रुतिका असायची. बहुतेक दुपारी. व त्यानंतर त्या श्रुतिकेला साजेसे एक मराठी गाणे लागायचे.
कुणाला आठवते का वरील लिहिलेले?