टिव्हीवर फारसे कार्यक्रम नव्हते तेव्हा एक दोन मस्त कृष्णधवल कार्टून्स लागायची त्यातील काही --
१. स्विम्मी - लहान मासे एकत्र होऊन मोठ्या माशाचा आकार करून त्यांना खायला टपलेल्या मोठ्या माशांना पळवून लावतात. (तात्पर्य: एकीचे बळ) हीच गोष्ट गेल्यावर्षी मुलीला इंग्रजी विषयाच्या पुस्तकात अभ्यासाला होती.
२. नाव आठवत नाही पण गाणं आठवतं 'सूरज एक चंदा एक तारे अनेक, एक तितली अनेक तितलीयॉं' याचा मध्यंतरी यू ट्युब किंवा गूगल विडिओ पाहिला होता.
३. रेल्वेवर आधारित एक कार्टून, ज्यात रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण व नियमांचे पालन करावे असा संदेश होता, त्यातील एक मस्त वाक्य 'शॉर्टकट फटाफट'