मागच्या वर्षी मराठी शाळांची दुरावस्था कशी टाळता येईल या साठी मुंबई येथे पालक, शिक्षक, मराठी प्रेमींची सभा झाली आणि बर्‍याच गोष्टी ठरवण्यात आल्या. त्यात एक यादी होती "मित्र मराठी शाळांचे".
मराठी मुलांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करवुन घेण्यासाठी, जागतिक स्पर्धेमध्ये टिकुन राहण्यासाठी, अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे यात कोणाचेही दुमत होणार नाही. यातील असलेली अडचण म्हणजे अशी यादी कोठे मिळावी, या दृष्टीने विचार करण्यात आला.
या प्रयत्नाचा परिपाक म्हणुन शुभदा चौकर, डॉ. उर्मिला पिटकर, श्री. अतुल पिटकर यांनी अथक परिश्रमातुन १ ते १० च्या मुलांनी, प्रत्येक तुकडीमध्ये ६० पुस्तके आवर्जुन वाचली पाहिजे अशी यादी बनविली. यात काही इंग्रजी पुस्तकांचाही समावेश केला. ( आठवड्यात १ पुस्तक फारसे अवघड राहु नये हा विचार).
या यादीमुळे जागृत पालक अशी पुस्तके मुलांना उपलब्धही करुन देवु शकतील आणि वेळोवेळी याचा आढावाही घेवु शकतील.   
आपण या संदर्भात श्री. अतुल पिटकर यांच्याशी संपर्क साधावा हि विनंती. ( ०२२-२३८७६५७१). ही लोक चळवळ असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने साह्य केले तर बरेच होईल. शेवटी हे माय मराठीचे कार्य आहे, याचे अगत्य असु द्यावे हि विज्ञापना.

द्वारकानाथ