मलाही हे गाणं आवडायचं. मी लहान असताना फिल्म्स डिविज़न की भेंट मध्ये आणखी एक गोष्ट दाखवायचे. हे चलत्चित्र कृष्णधवल होतं. त्यात ३ गोल असायचे, त्यांचेच विविध आकृत्या बनत - फुले, पक्षी, व्यक्ती, वगैरे, शेवटी ती पट्टे बनत, तीन चे सहा होत आणि ते इंद्रधनुष्य बने. जोडीला यमन मधलं वाद्यसंगीत होतं. फारच सुरेख. त्याचं नावही आठवत नाही.

दूरदर्शनवर संध्याकाळचे प्रादेशिक कार्यक्रम संपून राष्ट्रीय कार्यक्रमांना सुरुवात होताना सुरुवातीला एक लांबलचक संगीत असे. ते तोंडाने म्हणताना मस्त मजा यायची.