शाळेत जाताना घालायचा गणवेश आठवतो का? प्रत्येक शाळेचा गणवेशाचा रंग ठरलेला असायचा. गरवारे शाळेचा गुलाबी स्कर्ट-पांढरा शर्ट, रेणुका स्वरूपचा शाईसारखा निळ्या रंगाचा स्कर्ट व हुजुरपागा की अहिल्यादेवी शाळेचा गडद हिरवा आणि शाळेत वेण्यापण वर बांधून यायला सांगायचे. पेडाची वेणी घालून काळ्या रिबीनी लावून त्याही वर बांधायला लागायच्या.