एका वृक्षाची महती सांगणारं कार्टून होतं त्यात छोट्याशा रोपट्याचा वृक्ष होतो, त्याच्या सावलीने माणसे आणि  त्यावर राहणारे पक्षी  सर्व आनंदी असतात. नंतर एकजण तो वृक्ष तोडण्यास येतो व त्याला विरोध करणाऱ्या माणसाला ढकलून देतो. तो ढकलून दिलेला माणूस असा आपल्या डोक्याला हात लावून असा काय रडतो...

त्या कार्टून चे (खरेच "कार्टून" होते ते!) नाव होते: "एकता का वृक्ष" त्यात नंतर ते सफरचंद डोक्यावर पडते आणि मग सगळ्यांना प्रेमाचे भरते येते आणि "ढँड ढँड ढँड, ढडँ ढडँ..." करत सर्वजण एकदम "स्टायलीत" नाचतात!