पूर्वी मुलींनी केस कापायची फॅशन नव्हती. माझ्या सर्व मामेबहीणी लांब केसाचा मोठा शेपटा घालायच्या आणि महाविद्यालयात पण साडी नेसून जायच्या. त्यावेळी लग्नामध्ये अंबाडा घालायची फॅशन होती. अंबाडा घालण्यासाठी डोक्याच्या मागे एक मोठा बहुतेक केसाचाच बनवलेला गोल ठेवून त्यावरून केस वळवून घेत असत. आणि केस वळवले की त्याला आकडे लावायचे. नंतर त्यावरुन एक जाळी लावली जात असे. आणि परत त्या जाळीवरून आकडे लावायचे. नंतर त्यावरून गजरा. घरातली कोणीतरी मोठी बाई अंबाडा घालायची. ते घालत असताना आम्ही बहिणी अंबाडा कसा घालतात ते पहायचो. खूप मजा यायची.
गजऱ्यावरून आठवण झाली आम्ही लहानपणी प्लॅस्टीकचे गजरे काहीवेळा घालायचो.