कुठल्यान कुठल्या तरी विशेष कामामुळे लक्षात असलेले - हयात असलेले आणि नसलेले कलाकार: (जसे आठवलेत तसे)

  1. स्मीता पाटील - उंबरठा
  2. भक्ति बर्वे - फुलराणी (२००० मधे, "तुला शिकवीन चांगलाच धडा" पहायचा आणि त्यांच्याकडून थट्टा करून घेयचा योग आला होता)
  3. अरूण जोगळेकर - सख्खे शेजारी + अनेक
  4. बबन प्रभू - लक्षात नाही पण गजरा नक्की
  5. याकूब सईद (या दोघांची एक मालीका असायची)
  6. सुहास जोशी - सख्खे शेजारी, अग्नीपंख़ + अनेक
  7. विजय चव्हाण - मोरुची मावशी
  8. लक्ष्मीकांत बेर्डे - टूरटूर, शांतेचे कार्टे + अनेक
  9. विजय कदम - टूरटूर
  10. सुधीर जोशी - टूरटूर पासून ते अगदी "मेटलाईफ़च्या" जाहीरातीतील मिष्किल माणूस
  11. दादा कोंडके (असे कसे विसरून चालेल?) - अबाबा...!
  12. पद्मा चव्हाण - अबाबा... बाई कसली एक प्रकारचा पुरूषच! (इती दादा कोंड्के!)
  13. रमेश - सीमा - सुहासीनी + अनेक
  14. भारती आचरेकर - अनेक
  15. गदीमा (कलाकार म्हणून पण) - अनेक
  16. सुलोचना - अनेक
  17. राजा परांजपे - अनेक पण एक विशेष करून लक्षात म्हणजे - पेडगावचे शहाणे.
  18. मधू आपटे - "हवास मज तू हवास तू" - आम्ही जातो आमुच्या गावा + अनेक
  19. संध्या - पिंजरा, दो आँखे..
  20. अरूण सरनाईक - सिंहासन
  21. जयराम हर्डीकर - सिंहासन
  22. शांता जोग - लक्षात नाही पण - हिमालयाची सावली..
  23. श्रीराम लागू - अनेक
  24. दत्ता भट - नटसम्राट
  25. ???

यादी बरीच पुढे जाईल.

(सर्कीट साहेब यातले काही सिनेमे/नाटके आमच्या जन्मा आधीची आहेत पण "ओल्ड क्लासिक" म्हणून माहीत आहेत, नाहीतर आम्हाला आत्ताच सत्तरीत ढकलाल!)