दुर्लक्षाचा मुद्दा समजला नाही. रोमानी लोक मूळचे भारतीय उपखंडातील आहेत म्हणून आपण काय करायला हवे? तसे मग आपले प्रिय शेजारी पाकिस्तानी लोक भारतीय उपखंडातीलच आहेत. शिवाय त्यांनी स्थलांतरही केलेले नाही. त्यांची भाषा आपल्याला थेट समजते. त्यांची काळजी आपण करतो का?

हा विषय दुसरीकडेच जाईल म्हणून थोडक्यातः

  1. रोमानी लोकांबद्दल आपण काही करू शकत नाही हे मान्य
  2. पण त्याचा संबंध पाकीस्तानशी लावणे अनुचित वाटले.

रोमानी लोकांनी कोणावर अतिरेकी कारवाया केल्या नाहीत पण हिटलर्ने त्यांची ज्यूंपेक्षाही जास्त कत्तले केल्याचे ऐकिवात आहे. या उलट पाकिस्तानने वेगळा देशच नुसता केला नाही तर गेली पन्नास वर्षे फक्त भारताचा द्वेष केला आणि तो सक्रीयपणे आमलात आणला.

एक गोष्ट सांगतो: "एक शेजारी दुसऱ्याचा हेवा करायचा, त्याच्या पेक्षा आपल्याला जास्त मिळायला हवे म्हणून तो देवाची तपश्चर्या करतो. देव प्रसन्न होऊन वर देतो की हवे ते ह्वे तेव्हढे मिळेल, पण तुला जेव्हढे मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. दोन मिनिटे हा द्वेषी माणूस विचार करतो आणि म्हणतो की मला एका डोळ्याने आंधळा कर"!" मृदुला ताई आपले पाक बांधव असे आहेत!