लहानपणी दुरचित्रवाणीवर निरमा च्या जाहिरातींचा नुसता भडिमार चालायचा. चित्रहारची आठवण गोल गोल फिरणाऱ्या त्या मुलीच्या आठवणी शिवाय येउच शकत नाही. त्याच बरोबर "ओहोहो दिपीकाजी आईये आईये ये लिजीए आपका सब सामान तैयार" असं म्हणून स्वागत करणारा तो म्हातारा दुकानदार आणि नंतर दिपीकाजींनी त्यातली साबणाची वडी बदलून निरम्याची वडी घेतली की लगेच.. 'मान गये दिपीकाजी आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोको' हा डायलॉग अजुनही मला जसाच्या तसा आठवतो.

त्याचबरोबर 'बजाज' बल्बची 'जब मै  छोटा बच्चा था बडी शरारत करता था' ही ऍड मला तुफान आवडायची. बजाच्याच 'उलंद भारतकी बुलंद तसवीर' वाल्या जाहिरातीतर खूपच कल्पक असायच्या.