त्याही पलीकडे भारतातून परागंदा झालेल्या मूळ भारतीय वंशाच्या माणसांबद्दल भारतीयांचं दुर्लक्ष.
प्रियाली:"हे मात्र फारसं रास्त वाटत नाही. तत्कालीन समाज रचना लक्षात घेता या जमातींकडे नक्की कोणी लक्ष पुरवायला पाहिजे होते? (जिथे देशांत एकसंधता नव्हती, दळणवळाणाची साधने आणि माध्यमे अपुरी आणि अप्रगत होती तिथे हे कसे शक्य असावे?) तसेही या समाजाने आपली नाळ भारताशी जोडून राहील असे काही केले असावे असे वाटत नाही. त्यामुळे कालांतराने दुवे तुटले असावेत आणि ही जमात मूळ भारतातून तिथे गेली ही माहिती दोन्ही बाजूंनी धूसर झाली असावी.
सहमत
सध्याच्या काळातही देशांतर्गत प्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी नाही(सहमत). तेथे नाळ तुटलेल्या जमातींची काळजी करणे व्यवहार्य वाटत नाही."[आखातात युद्धे झालीकी आम्ही विमान बोटी घेउन धावतो ; हे असूद्या ज्यांची आखातात धार्मिक नाळ आहे त्यांना दर्शन यात्रे साठी खास सुविधा उपलबद्ध करतोच (यांच्या सुविधांना विरोध असा इथे उद्देश नाही)]
मृदुला:"दुर्लक्षाचा मुद्दा समजला नाही. रोमानी लोक मूळचे भारतीय उपखंडातील आहेत म्हणून आपण काय करायला हवे?"[इंडॉलॉजीच्या नावाखाली युरोपीय अभ्यासक भारतात येऊन अभ्यास संशोधन करून जातात,भारतीय विद्यापीठांनी रोमानी बाबत संशोधन अशक्य कोटीतलं नसावं.किमान रोमानींच्या काही मुलांना भारतात शिक्षणवृत्ती देता येऊ शकते.आणि आमचे उजवे संस्कृती रक्षक तिकडे पण असतात त्यांनी तरी यांची थोडी आठवण करावयास काय हरकत आहे? आणि ह्याच रोमानी लोकांकडे समृद्धी असतीतर/राजकीय फायदा असतातर-आम्ही त्यांच्या मागे धावलो नसतो? कम्युनिस्ट देशांशी तर आपले चांगले राजकीय संबंध ही होते ]
नाम्या:"रोमानी लोकांनी कोणावर अतिरेकी कारवाया केल्या नाहीत पण हिटलर्ने त्यांची ज्यूंपेक्षाही जास्त कत्तले केल्याचे ऐकीवात आहे."-[सहमत एव्हढासा इज्राएल आणि त्यांचा एव्हढासा धर्म पण आवाज केव्हढा.आपला देश सहस्रपटीने मोठा आहे आवाज करण्या करिता ;गरज इच्छाशक्तीची असते असे वाटते.]
-प्रतिसादांबद्दल धन्यवाद-विकिकर