टूरटूर नाटकातील एक किस्सा - सई परांजप्यांसारख्या समर्थ लेखिकेनी नाटक आणि प्रसंग लिहीला असल्यामूळे मी तो इथे नुसता उर्धृत करत आहे!: कृपया खूपच हलके घ्या!
"टूर" वरती सतत शिव्या मुले देत असलेली पाहून शिक्षक सुधीर जोशी एक दिवस "सौजन्य दिन" पाळायला सांगतो. त्या दिवशी कोणीही एकही शिवी देयची नाही. मग शब्दांच्या बऱ्याच कसरती आहेत, ज्या सर्व लक्षात नाहीत. पण सरते शेवटी वैतागून त्यालाच न ऐकणाऱ्या लक्ष्मिकांत बेर्डेला एक शिवी हासडावीशी वाटते. पण स्वतःच्याच नियमात अडकल्यामुळे आणि सौजन्य दिन असल्यामुळे खोटे हसत लक्ष्याला म्हणतो: " तुझ्या गाडीवर टिंब देवून एक लत्तप्रहार करीन!"