आमच्या वऱ्हाडी बोलीत सुद्धा शिव्या भरपुर प्रमाणात आहेत. शिव्या केवळ रागाने आणि भांडणातच दिल्या पाहिजेत असं काही नाही. माझ्या पाहण्यात कित्येक लोक अशी आहेत की, त्यांच्या वाक्यात क्रियापदा एवढी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवी आहे.

वऱ्हाडात शिव्यांचे वेगवेगळे प्रकार भेटतील, अस्सल मराठी , वऱ्हाडी, हिंदी आदी सर्वच...

प्रसिद्ध वऱ्हाडी  लेखक विठ्ठल वाघ तर आपल्या खास वऱ्हाडी शिव्यांसाठी प्रसिद्धच आहेत. ते शिव्या देतात म्हणून त्यांना कुणीही वाईट म्हणतांना दिसत नाही. उलट त्यांच्या शिव्यांतही  वऱ्हाडी बाज दिसतो.

शिव्या आणि कसलंही नाव अर्धे करण्यात वऱ्हाडाचा कोकणाशी जवळचा संबंध दिसतोय.

नीलकांत