वा..वा सर्किटराव,
तुम्ही हे नाव देऊन अगदी मला माझ्या शाळेच्या दिवसात नेलेत की!!
'प्रवाचक: बलदेवानंद सागर:' हे ऐकले की घरातून निघायचे..
सुंदर होते ते दिवस...
रोहिणी,
गणवेशाचे म्हटलीस तेव्हा आठवले की माझी चुलतबहिण रेणूकास्वरूप मध्ये होती आणि तिची वाड्यात राहणारी घट्ट मैत्रीण हुजुरपागामध्ये... त्या दोघी जेव्हा भांडायच्या तेव्हा हमखास 'हुजुर हुजुर खाते खजूर' आणि'रेणूका मनुका' असे काहीतरी चिडवायच्या..मजा वाटायची तेव्हा..
अंजू